घरची पारिस्थिती हालाखीची असली तरी काय झालं जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर माणूस काहीही करू शकतो हे होनगा सारख्या छोट्याश्या खेड्यात राहणाऱ्या शीला हिने सिद्ध करून दाखवलंय. आई वडिलांचा आधार सहावीत असताना हरपला केवळ आजीनं तिचा संभाळ केला गरिबी वर मात करत शीला ने यश मिळवलंय .
मराठा मंडळ चव्हाट गल्ली येथील पी यु सी सायन्स मध्ये शिकणाऱ्या शीला केरळकर हिला सायन्स विभागात 97.58टक्के गुण मिळालेत. फिजिक्स 100,केमिस्ट्री 100,मथस 100 तर बायोलॉजी 95 असे गुण मिळवत मराठा मंडळ मध्ये प्रथम क्रमांक मिळवत हे घवघवीत यश संपादन केलंय.
शीला केरळकर ही बेळगाव तालुक्यातील होनगा गावातील तानाजी गल्लीत आपल्या आजी आणि लहान भावासह राहते. वडील शहाजी आणि आई शारदा यांचा शीला सहावीत असतेवेळी अपघाती निधन झालं होतं तेंव्हा पासून शीला आजी सुशीला पाटील सोबत होनगा येथे रहाते .आजी लग्न सराईत स्वयंपाक करून आपल्या दोन्ही नातवाचं उदर निर्वाह करते.
मराठी माध्यमाला यश
प्राथमिक मराठी शिक्षण होनगा सरकारी मराठी शाळा तर होनगा हायस्कुल मध्ये माध्यमिक शिक्षण घेत मराठा मंडळ सारख्या अन्य कॉलेज च्या तुलनेत कमी सुविधा असणाऱ्या कॉलेज शिकणाऱ्या शीला च यश आदर्श वत आहे. शीला केरळकरने बेळगाव live शी बोलताना सांगितलं की कोणत्याही प्रकारच खाजगी ट्युशन न घेता मी हे यश मिळवलं आहे यासाठी अति जास्त किंवा टार्गेट ठेऊन अभ्यास केला नसून जितका वेळ तितका अभ्यास केला आहे .कॉलेज मधील सर्व प्राध्यापकांच मार्गदर्शन मिळालं असून फॉरेन्सिक लॅब मध्ये करियर करायचा मानस आहे शीला या यशास बेळगाव live च्या शुभेच्छा..