ऑटो नगर कणबर्गी भागात बेकायदेशीर रित्या सुरु असलेले कत्तलखाणे बंद करा अशी मागणी बेळगाव शहर उत्तर भाजपने केली असून या संबंधी पर्यावरण प्रदूषण अधिकारी आय एस जगदीश यांना निवेदन सादर केले आहे.
ऑटो नगर वसाहतीत जल प्रदूषण कायदा १९७४ कलंम ३३ उल्लंघन केल्या वरून टाळे ठोकण्याचे आदेश आहेत मात्र तरी देखील हे कत्तल खाणे सुरूच आहेत या बेकायदेशीर कत्तल खाण्यामुळे या भागातील पाणी दुषित होत असून सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे कोल्ड स्टोरेज च्या नावाखाली हे सगळे कत्तल खाणे सुरु आहेत अश्या कत्तल खाने बंद करावे असं निवेदनात म्हंटल आहे . उत्तर भाजप अध्यक्ष श्रीनिवास बिसंनकोप्प यांनी बेळगाव live ला सांगितले कि कोल्ड स्टोरेज ना शेतकी माल कृषी उत्पादन साठवून ठेवण्याची परवानगी असते मात्र या कत्तल खाण्यात कोल्ड स्टोरेज मध्ये विविध ठिकाणी कापून आणलेले मांस स्टोरेज करण्यात येत आहे परवागी पाकिंग करून पाठविले जात आहे हे कत्तलखाने बंद करा अन्यथा उत्तर भाजप आंदोलन करील असा इशारादेखील दिला आहे . यावेळी भाजप नेते किरण जाधव , गजेश नंद्गडकर,संतोष पेडणेकर,गुरु पाटील ,केदार जोरापुरी, विजय कदम , प्रज्ञा शिंदेम स्नेहल कोले लक्ष्मी बाचुळकर आदि उपस्थित होते