राज्यातील सर्वात मोठी जिल्हा पंचायत असलेली बेळगाव जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष पद मिळून एक वर्ष झालं तरी नवीन कार देण्यात आलेली नाही जर मे महिन्याच्या आत नवीन कार खरेदी केली नाही तर ऑटो नी कार्यालयास येऊ असा इशारा जि प अध्यक्ष आशा ऐहोळे यांनी दिलाय.
शुक्रवारी जिल्हा पंचायत मध्ये झालेल्या के डी पी बैठकीत विकास कामाबद्दल चर्चा करताना त्या बोलत होत्या. लोकांच्या समस्या सोडविण्यात पूर्ण जिल्हा फिरताना जुनी कार अनेकदा बंद पडत आहे. राज्यातील सर्व जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षाना कार दिली आहे मात्र बेळगाव ला का डावलण्यात आलं आहे असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
जिल्हा पंचायतीकडे अनुदान नव्हतं आता 26 लाख अनुदान राज्य शासनाने मंजूर केलं आहे त्यामुळं जून च्या आत नवीन कार खरेदी करू अशी माहिती अधिकाऱ्यांच्या वतीनं सी ई ओ डॉ रामचंद्रन यांनी ऐहोळे यांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला तरी ऐहोळे यांनी मे च्या आत नवीन कार मिळाली नाही तर ऑटो ऑफिस ला येऊ असा इशारा दिला आहे