बेळगाव महा पालिकेने भाजप आमदार संजय पाटील यांच्या मालकीचं रस्त्यावर असलेलं अनधिकृत शेड हटवण्यासाठी बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या स्थायी समिती अध्यक्ष आणि नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वात आर पी डी क्रॉस जवळ हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे.
बेळगाव पालिकेने रस्त्यात आलेलं शेड हटवण्यासाठी टाळाटाळ सुरू केल्याने शेवटी आंदोलनाचं हत्यार गुंजटकर यांनी उपसले आहे.
कर्नाटक उच्च न्यायालायचा आदेश असताना देखील केवळ आमदार असल्यानं कारवाई करत नसून बेळगाव पालिकेच्या आकार्यक्षमतेचा हा नमुना आहे मास्टर प्लँन मध्ये सामान्य माणसाला एक न्याय आणि लोकप्रतिनिधी ला एक न्याय असा दुजाभाव करत आहे असा आरोप विनायक गुंजटकर यांनी केला आहे
यावेळी वकील नागेश सातेरी,नगरसेवक मोहन भांदुर्गे, विजय भोसले रामचंद्र चव्हाण, रामकृष्ण पवार,जीवन सायनाक ईश्वर लगाडे, सुरेश नाड गर,व्ही ओ येतोजी, कृष्णा कुलकर्णी, निंगोजी नाईक, महेश जुवेकर आदी सहभाग घेतला आहे.
पालिका अभियंता आर एस नाईक यांनी आंदोलन सुरू व्हायच्या अगोदर पालिका आयुक्त बेळगाव बाहेर गेले आहेत ते आल्यावर गोमटेश शेड हटवू अस आश्वासन दिलं होत.पूर्ण सरकारी यंत्रणेला चॅलेंज देत गुंजटकर यांनी भाजप आमदार विरोधात शड्डू ठोकला आहे इतर नगरसेवक लोक प्रतिनिधी काय भूमिका घेतात हे बघणे महत्वाचे आहे