आगामी 22 मे होणाऱ्या मराठी परी पत्रकांचा मोर्चा आणि सीमा प्रश्नाच्या पुढील लढाई साठी घटक समित्या मधून युवकांना सामावून घेऊन मराठी साठी युवकांना काम द्या युवकांना सामावून घेतलं तर यश नक्की आहे अशी मागणी शहर समिती बैठकीत मदन बामणे यांनी केली आहे.
रविवारी सायंकाळी रंगुबाई भोसले येथील समिती कार्यालयात 22 मे मराठी परी पत्रकासाठी मोर्चा चया पाश्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. बैठकीच्या नवीन मध्यवर्ती समितीत निवड झालेल्या दीपक दळवी प्रकाश मरगाळे आणि मालोजी अष्टेकर यांचा सत्कार करण्यात आला . दळवी यांची निवड मध्यवर्ती समितीत झाल्याने शहर समितीकडे दुर्लक्ष होता कामा नये शहर समिती देखील ऍक्टिव्ह करण्याची गरज आहे या साठी मध्यवर्ती खजिनदार प्रकाश मरगाळे यांची शहर समिती अध्यक्ष पदी निवड करावी अशी मागणी देखील मदन बामणे यांनी बैठकीत केली .
२२ मी रोजी मराठी परी पत्रकासह इतर मागण्याच्या मोर्चासाठी बेळगाव शहरात जनजागृती मोहीम हाती घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला . २२ मी रोजी मोर्चात सुपीक जमिनी बळकावू नये , बेळ्ळारी नाला अतिक्रमण थांबवावे, मास्टर प्लॅन विस्थापितांना मदत द्यावी , या मागणी समाविष्ट कराव्यात या बद्दल चर्चा करण्यात आली