मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे.शुक्रवारी रात्री साडे नऊच्या सुमारास फडणवीस सांबरा विमान तळावर आले असता एकीकरण समिती नेत्यांनी बेळगाव सीमा प्रश्नी सविस्तर चर्चा केली .
इचलकरंजी सांगली दौरा आटोपून मुंबईला जायला सांबरा विमान तळावर आले असता समिती नेत्यांनी फडणवीस यांची भेट घेतली.सुप्रीम कोर्टात केंद्राची भूमिका तटस्थ राहण्याची गरज आहे आपण याकामी पुढाकार घ्यावा अशी विनंती करण्यात आली त्यावेळी फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या वकिलांशी आणि इतरांशी आपण बोललो असून लवकरच यावर आपणास यश मिळेल असा विश्वास यांनी यावेळी व्यक्त केला. कोल्हापुर चे पालकमंत्री आणि बेळगाव समनवयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी इथून पुढं महिन्याला एक आढावा बैठक घेऊ अस आश्वासन दिलं. यावेळी समिती अध्यक्ष दीपक दळवी, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर,मनोहर किणेकर,राजू मरवे विजय होनगेकर आदि उपस्थित होते.
किरण ठाकुरांची मुख्यमंत्र्यांशी दुरध्वनी वर चर्चा
शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष किरण ठाकूर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी दूरध्वनी वर चर्चा केली मराठी भाषिकावरील अन्याय दूर करा अशी विनंती केली. शहरातील ट्राफिक मूळ सांबरा विमानतळा वर शहर समितीच्या शिष्टमंडळास पोचायला विलंब झाला तेवढ्यात मुख्यमंत्री विमानात बसले होते यावेळी चंद्रकांत दादा पाटलांच्या फोन वरून ठाकूर यांनी फडनविसांशी चर्चा केली कर्नाटक सरकार जोवर मराठी परीपत्रक देत नाही तोवर महाराष्ट्राने कर्नाटकाला पाणी देण्याबाबत विचार करावा आणि मराठी माणसावरील अन्याय कमी करावेत अशी विनंती केली .यावेळी किरण गावडे उपस्थित होते.