पत्रकार अधीकारी आणि राजकारणी असलेल्या व्हाटस अप्प ग्रुप वर अश्लील फोटो टाकणाऱ्या भाजप आमदार महंतेश कवटगीमठ यांना हे प्रकरण चांगलंच भोवणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. या प्रकरणाची कर्नाटक प्रदेश भाजपने गंभीर दखल घेतली असून संबंधित आमदाराकडून स्पष्टीकरण मागण्यात येणार आहे.
राज्य भाजप सरचिटणीस रवी कुमार यांनी याबाबत बेळगाव जिल्हा भाजप लवकरच संबंधित आमदारकडून स्पष्टीकरण घेणार आहे असे संकेत दिले आहेत तर दुसरी कडे बेळगाव जिल्हा भाजप अध्यक्ष राजेंद्र हरकुनी यांनी बेळगाव live ला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले कि या आमदाराने या विषयी खाजगी वृत्त वहिनी वर दिलगिरी व्यक्त केली आहे त्यामुळं हे प्रकरण इथेच संपलं अस आम्हाला वाटतंय अस म्हणाले.
व्हाट्स अप्प ग्रुप वर अश्लील फोटो पोस्ट केल्या नंतर जेष्ठ विधान परिषद सदस्य महंतेश कवटगीमठ यांनी लागलीच आपला फोन बंद केला होता अनेक पत्रकार आणि प्रसार माध्यमाच्या प्रतिनीधींनी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद आहे . त्यांनी आपला फोन बंद केल्यामुळे अश्लील फोटो पोस्ट प्रकरण अधिक आणखी गडद झालं आहे. या प्रकरणामुळे नैतिकता असलेल्या भाजपा चांगलीच बदनामी झाली आहे