निवडणुकांना एक वर्ष उरलं आहे त्यामुळे आगामी काही दिवसात राज्याच्या राजकारणात मोठ्या घाडामोडी अपेक्षित आहेत 2018 मध्ये निधर्मी जनता दल सत्तेत राहील असा ठाम विश्वास माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी व्यक्त केला आहे.
बेळगावात सांबरा विमानतळा वर आले असता पत्रकारांशी ते बोलत होते.
भाजप आणि काँग्रेस मधून जनता दलाकडे येणाऱ्यांची संख्या मोठी असून दिवसेंदिवस हा आकडा वाढतच आहे अनेक बडे नेते जनता दलात येण्यास इच्छुक आहेत.बेळगाव जिल्ह्यातील सतीश जारकीहोळी आणि उमेश कत्ती जनता दलात आल्यास त्यांचं स्वागतच आहे या जिल्ह्यात पुढील निवडणुकीत जे डी एस डबल फिगर गाठेल अस ते म्हणाले. कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या समस्येकडे केंद्र आणि राज्य सरकार ने दुर्लक्ष केलं असून शेतकऱ्यांच्या या परिस्थितीला भाजप काँग्रेस दोघेही जबाबदार आहेत असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे