कर्नाटक पोलिसांचा विरोध झुगारत मोर्चा यशस्वी केल्या नंतर पोटशूळ उठलेल्या कानडी पोलिसांनी मराठी लोक प्रतिनिधी आणि नेत्यांना टार्गेट केल आहे.जय महाराष्ट्र म्हणण पडल असून महागात समिती आमदारासह नेत्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
मोर्चात जय महाराष्ट्र घोषणा दिल्यामुळे पोलिसांनी आमदार संभाजी पाटील, आमदार अरविंद पाटील यांच्या सह मध्यवर्ती समिती अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर आदी वर गुन्हे दाखल केला आहेत . त्यामुळे पुन्हा पोलिसांची दडपशाही सुरूच आहे अस वातावरण आहे .
दोन भाषिकात तेढ निर्माण करणे कर्नाटक राज्याचा अपमान करणे असे गुन्हे यांच्या वर दाखल करण्यात आले आहेत . पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मोर्चात जय महाराष्ट्र सह संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिलेल्या वर गुन्हा १५३ अ , १८० ,आय पी सी ३४ कलम लावण्यात आली आहेत बेळगाव पोलीस उपायुक्त अमरनाथ रेडी यांच्या मार्गदर्शना खाली हे गुन्हे लादण्यात आले आहेत