निडगल ता खानापूर चा रहिवासी आणि लष्करी जवान विशाल पांडुरंग लोहार वय ३३ याचा लष्करी सेवेत झालेला अचानकचा मृत्यू संशयाचे कारण ठरला आहे. काही माध्यमांनी विशालने आत्महत्या केल्याची वृत्त प्रसारित केले होते, मात्र त्याच्या नातेवाईकांचा यास विरोध विरोध आहे. लष्कराने याचे उत्तर देण्याची मागणी त्यांनी केले. सध्या ही आत्महत्या की घातपात हा संशय कायम आहे.
विशाल मागील १४ वर्षे लष्करी सेवेत आहे. राष्ट्रीय रायफल मद्रास ५४ मध्ये त्याची बदली झाली होती. सध्या तो जम्मू काश्मीर येथील राजोरी येथे राहत होता.त्याच्या कोर्टर्स जवळच त्याला गोळी लागून त्याचा मृत्यू झाला आहे, त्याने आत्महत्या केल्याची पसरविण्यात आले असल्याने ते खरे की खोटे हा प्रश्न असून नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार विशाल आत्महत्या कधीच करणाऱ्यातला नव्हता.
त्याच्या मृतदेहाच्या शवंचिकित्सेचा अहवाल आल्यावर सारेकाही स्पष्ट होईल.