शहरातील बांगलादेशी घुसखोरांची केस आंतरिक सुरक्षा विभागाकडे सोपविण्यात येणार आहे लवकरच बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयातून या हालचालीकरण्यात येणार आहेत .
राज्य पोलीस महा संचालक रुपकुमार दत्ता यांनी हे प्रकरण खूप गांभीर्याने घेतल असून या प्रकरणाची अधिक चौकशी करावी यासाठी याचा अधिक तपास आता आंतरिक सुरक्षा विभाग करणार आहे लवकरच पोलीस आयुक्ताकडून या केस माहिती आंतरिक सुरक्षा विभाग घेणार आहे अशी माहिती उपलब्ध झाली आहे .
ऑटो नगर येथील कत्तलखान्यात काम करणाऱ्या १२ बांग्लादेशी घुखोराना बेळगाव पोलिसांनी अटक केली होती त्या घुसखोरांनी आधर कार्ड रेशन कार्ड सह बनवत पासपोर्ट देखील बनवली होती अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली होती. खाजगी इस्पितळातून बनावट जन्म दाखलामिळविला होता यावर रेशन कार्ड आणि आधार कार्ड देखील बनवून घेतले होते असा देखील तपासात उघड झाल होत पोलिसांनी हॉस्पिटल नाव उघड केल नव्हत आता आंतरिक सुरक्षा विभागाकडून या प्रकारांची चौकशी होणार असल्याने बेळगावात अजून किती बांग्लादेशी आहेत याचा तपास देखील होणार आहे .