एकेकाळी बेळगावात रिलीज होणाऱ्या मराठी चित्रपटाचं माहेरघर असलेल्या हंस थिएटर चे सेन्ट्रल मॉल मध्ये रूपांतर होणार आहे. 30 मे 2012 मध्ये सदर हंस इमारत पाडवल्यानंतर असच पडली होती बुधवारी सकाळी या ठिकाणी शक्ती डेवलोपर्स फलक लावण्यात आला असून सेन्ट्रल मॉल नावाने कॉम्प्लेक्स बांधण्यात येणार आहे.
परदेशी बंधू यांनी हंस थिएटर 17 डिसेंम्बर 1944 ला सुरू केलं होतं शहरातील एक जून आणि मराठी चित्रपटाच माहेरघर असणार थिएटर होत. 30 मे2012 ला हे थिएटर बंद झालं
बेळगाव शहरात मॉल कल्चर ची नवीन संकल्पना या सेन्ट्रल मॉल मिनी मार्केट मध्ये अवलंबिण्यात आले असून युरोपियन पद्धतीच डिजाईन या मॉल मध्ये करण्यात आली आहे. शक्ती डेवलोपर्स संचालक कनुभाई ठक्कर यांनी बेळगाव live ला दिलेल्या मुलाखातीत सांगितलं की रोड वरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मॉल च्या सर्व मजल्यावरील दुकान दिसतील अशी संकल्पना युरोपियन डिजाईन मध्ये मांडली आहे.गणेशपूर येथील आर्किटेकट रवी धोपे यांनी हे डिजाईन बनविल असून आगामी एक वर्षात सेन्ट्रल मॉल च काम पूर्ण होईल असा दावा त्यांनी केला आहे.
शक्ती डेवलोपर्स च्या वतीनं सेन्ट्रल मॉल मधील नवीन दुकान लीज वर देण्यात येणार आहेत विक्री करण्या ऐवजी अधिक अवधीच्या लीज वर दुकान देणार असून दिल्ली मुंबई सारख मिनी मार्केट या व्यापारी संकुलात असणार असून बेस मेंट मध्ये पार्किंग सुविधा असणार आहे