हुबळी लायन्स क्लब,ऑल इंडिया जैन युथ फौंडेशन आणि हारुगेरी जनता को ऑप सोसायटीच्या वतीनं 13 मे रोजी हारुगेरीत कृत्रिम पाय जोडणी आणि साहित्य वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
सी ए चन्नवीर मुंगरवाडी आणि हुबळी चे सामाजिक कार्यकर्ते महेंद्र सिंघी यांनी बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली हारुगेरीत या दिवशी आरोग्य तपासणी शिबिराचे देखील आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.
अपघात किंवा इतर रोगांनी काढण्यात आलेले रुग्णांचे हात पाय बसविण्यात येणार असून सकाळी 9 ते 2 वेळेत आरोग्य तपासणी शिबिर होईल असं ते म्हणाले
अपंगांनी किंवा कृत्रिम हात पाय जरुरी असलेल्यानी शिबिरात सहभागी होण्यासाठी 9449442254 किंवा 08331257054 शी संपर्क करावा अस आवाहन देखील करण्यात आलं आहे
हारुगेरी शहरात या भव्य शिबिराचा आयोजन करण्यात आलं आहे