सांडपाणी प्रकल्पासाठी सुपीक जमीन
बळकावू नये या मागणीसाठी हलगा येथील शेतकरी पुन्हा आंदोलन करणार आहेत. महा पालिकेच्या सारसाधारण बैठकी दिवशी दोन हजार शेतकरी घेराव आंदोलन करणार आहेत.हलगा येथे शेतकऱ्यांची बैठक झाली या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
महा पालिकेच्या सांडपाणी प्रकल्पासाठी शासनाने 16 एकर जमीन संपादन करण्याची प्रक्रिया चालविली आहे.सुपीक जमिनी ऐवजी अलारवाड येथील पडीक जमीनीवर हा प्रोजेक्ट् राबवा अशी मागणी शेतकरी करत आहेत.
बैठकीत कामगार नेते अड एन आर लातूर यांनी हलगा शेतकऱ्यांची जमीन वाचवण्यात संपूर्ण कामगार संघटनेचा घेराव आंदोलनास पाठिंबा दिला.यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, माजी महापौर शिवाजी सुंठकर आदी उपस्थित होते