बेळगाव महा पालिकेच्या वतीने हलगा येथील १९ .११ एकर सुपीक जमिनीत घालण्यात आलेला सांडपाणी प्रकल्प रद्द करून अन्यत्र करावा या मागणीसाठी हलगा येथील शेतकऱ्यांनी महा पालिकेसमोर तब्बल एक तास हून अधिक काल निदर्शन केली. सांडपाणी प्रकल्प हटवावा या मागणीसह कणबर्गी ऑटो नगर येथील कोल्ड स्टोरेज च्या नावाखाली चालविण्यात येत असलेले कत्तल खाने बंद करावा आणि तुरमुरी कचरा डेपो देखील अन्यत्र हलवावा या मागण्या देखील यावेळी करण्यात आल्या .
हलगा एवजी सांडपाणी प्रकल्प आलारवाड येथील बंजारा जमिनीत करावा अशी मागणी केली माजीमहापौर शिवाजी सुंठकर, नागेश सातेरी, शेतकरी संघटनेचे नारायण सावंत, साजिद सय्यद ,किरण गावडे, प्रकाश शिरोळकर, अरविंद नाग्नुरी, भाऊ गडकरी,रमाकांत कोंडुसकर आदी नेत्यासह शेकडो शेतकरी बांधवांनी आंदोलनात भाग घेतला होता.
हलगा सुपीक जमिनीत हा प्रोजेक्ट रद्द करा असा ठराव करा अन्यथा आंदोलन मागे घेऊ शी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतल्यावर महापौरांनी या विषयावर आपण कायदेशीर सल्ला घेऊन शेतकऱ्यां वरील अन्याय दूरू करू अस आश्वासन दिल्यावर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतल. आमदार संभाजी पाटील संजय पाटील आणि महापौर संज्योत बांदेकर यांनी आपले विचार यावेळी मांडले मात्र आंदोलकांनी पालिका आयुकतानी याबाबत आश्वासन ध्याव अशी मागणी केली मात्र आयुक्तांना टाळाटाळ केल्याने शेतकरी नेते आणि आयुक्तांत बराच काल संघर्ष निर्माण झाला होता आयुक्त शशिधर कुरेर यांच्या अप्रोच चुकींच असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी करत आयुय्क्तांची बदली करा अशी मागणी देखील केली.
पोलीस रामसेनेत वाद
आंदोलन पालिका कंपाउंड बाहेर करा अशी सूचना आंदोलनां पोलीस करत होते यावेळी एका आंदोलकास पकडून पोलिसांनी दमदाटी करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी राम सेनेंचे रमाकांत कोंडुसकर आणि माल मारुती पोलीस निरीक्षक टेंगरीकर यांच्यात शाब्दिक चकमक उडाली त्यावेळी बराच काल तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.