बेळगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांवर सध्या विष पिण्याचीच वेळ आली आहे. कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांच्यावर भूसंपादनाची टांगती तलवार घोगवतेय यामुळे आपली जमीन वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान बळीराजासमोर आहे.
मास्टर प्लॅन च्या नावाखाली शहरातील ३००० एकर जमिनीचे लँड युज बदलण्याचा प्रकार झाला. हिरवेगार बेळगाव शिवार हिसकावून घेण्याचे हे षडयंत्र होते. शेतकऱ्यांनी यावर सर्वोच्च न्यायालयात लढा दिला तूर्तास ते टळले असले तरी पुन्हा कधी दाखल होईल याचा नेम नाही.
बेळगावला लागून असलेल्या २१ खेड्यांमधील पिकाऊ जमिनी लाटण्यासाठी त्या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर थेट नो क्रॉप असा उल्लेख झाला आहे, त्यासाठीचा लढा सुरू आहे.
बेळगाव शेतकरी संघटनेचा आक्रमकपणा आणि तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर यांच्या सारख्या नेत्याची साथ या जोरावर गांधीनगर येथे होणारे संपादन रोखून शेतकऱ्यांनी मायभूमी राखली आहे.
आता हलगा येथील पिकाऊ जमिनीवर सांडपाणी प्रकल्प उभारण्याचा मनसुबा आखला आहे. तेथेही शेतकऱ्यांची लढाई सुरूच आहे.
बायपास असो वा महामार्ग शेतकऱ्यांवर अन्याय करून विकासाचे प्रकल्प होताहेत, तुम्हाला काहीही करायचे झाले की शेतकरीच दिसतो का?
अरे हजारो एकर च्या मालकांनो किती दिवस शेतकऱ्यांनाच लुटत राहणार?
Trending Now