बेळगावात घुसखोर बांग्लादेशी प्रकरणात वेगळं वळण लागलं असून बेकायदेशीर रित्या देशात राहण्यास मदत करणाऱ्या बेळगाव ऑटो नगर येथील पाच कोल्ड स्टोरेज कारखाना मालकाना आणि इतर स्थानिक दोघांना अटक करण्यात आली आहे. या पाच कोल्ड स्टोरेज मालकांनी बांग्लादेशीना बेळगावात रोजगार उपलब्ध करून दिला ते सर्व जण ऑटो नगर येथील कत्तल खाण्यात काम करत होते तर इतर दोन स्थानिकांनी दोघांनी बेळगावात बँक अकौंट आधार कार्ड घर भाड्याने शोधून देने अशी वास्तव्य करण्यास मदत केली होती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जावेद इनामदार, मोहम्मद हुससेन बरफवाले, इम्रानखान पठाण, नवाज खान पठाण, मोबिन बेपारी अशी अटक केलेल्यांची नाव आहेत हया सर्व जणांनी बांग्लादेशीना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या होत्या तर रिहाना कट्टीमनी आणि मेहबूब शेख या दोघांना बेकायदेशीर रित्या बेळगावात राहण्यास मदत केली म्हणुन अटक करण्यात आली आहे.माळ मारुती पोलीस निरीक्षक चन्नकेशव टेंगरीकर यांनी ही कारवाई केली आहे. एकूणच बांग्लादेशी घुसखोर आणि ऑटो नगर येथील कोल्ड स्टोरेज कत्तल खाने चर्चेत आहेत