मंथन अनिल कणबरकर रा होसुर बसवान गल्ली, तो मराठा मंडळाच्या सेंट्रल हायस्कूल चा विध्यार्थी.दहावीत त्याने ९७ टक्के गुण मिळविले. मराठीत ११७, इंग्रजी ९९ , कन्नड ९५ गणित९६, विज्ञान ९७, समाजशास्त्र ९६, एकूण ६०१.ही त्याची कामगिरी.
मराठा मंडळ मध्ये पहिला आणि बहुतेक बेळगाव शहरात मराठी माध्यमात पहिला येण्याचा मान त्याने मिळविला आहे. याची त्याला मात्र सुतराम कल्पना नव्हती. यामुळे शिक्षकांना त्याला अक्षरशः शोधावे लागले. भाजी मार्केट मध्ये काम करून स्वतःचे शिक्षण तसेच घराला हातभार लावणाऱ्या मंथनला त्याच्या आईने पेढा भरविला, त्यावेळी साऱ्यांचेच डोळे पानाविले.
भाजी मार्केट मधील बर्डे यांचे दुकान न ६८ मध्ये तो कामाला होता. आई अंगणवाडी मदतनीस तिचे नाव रेणुका कणबरकर आहे. वडील वारून ६ वर्षे झाली. यामुळे सहावी इयतेपासून तो स्वतः काम करतो.
मंदिरा ही त्याची जुळी बहीण आहे तीही दहावी उत्तीर्ण झाली असून तिला ७६ टक्के गुण मिळाले आहेत. तर आणखी एक मोठा भाऊ असून तोही कामाला जातो. तर अशी ही मंथन ची गौरव गाथा आहे. गरिबीवर मात करत मंथन याने आपल्या आई सह शाळेचं नाव देखील उज्वल केलं आहे.
सातवीत असताना सुट्टीत भाजी मार्केट मध्ये कामाला 2 हजार रुपये जमवले होते आणि त्या पैशातून आम्ही त्याला सेन्ट्रल स्कुल मध्ये अडमिशन मिळवलं होतं आमच्या गल्लीतील नगरसेविका सुधा भातकांडे यांना घेऊन आम्ही सेन्ट्रल स्कुल च्या मुख्यध्यापक डोनेशन कमी करण्यासाठी भेटलो होतो अशी आठवण रेणुका कणबरकर यांनी यशाचे अश्रू काढत उपास्थित शिक्षकासमोर काढली.तर तू एवढा हुशार प्रामाणिक आहेस तुझ्या शिक्षणाचं पुढं कस ?अस विचारल्यावर गरिबी मूळ आपलं महाविद्यालयीन शिक्षण हुकेल का असा या काळजीनं ऐन परीक्षेत रडला होता अशी माहिती शिक्षक अरविंद पाटील यांनी यावेळी दिली. शुक्रवारी सायंकाळी मराठा मंडळ मुख्याध्यापक विश्वजित हसबे यांच्यासह दशरथ सावंत, अरविंद पाटील, व्ही एस मननोळकर यांनी त्याला भाजी मार्केट मधून शोधून घरी आणून सत्कार केला तर आई रेणुका यांनी पेढा भरविला.
अत्यन्त गरिबीतून यश मिळवलेल्या अश्या विध्यार्थ्यांना समाजातून मदतीची अपेक्षा आहे आम्ही बेळगाव live च्या वतीनं अश्या मलांच्या शिक्षणासाठी मदत करा अस आवाहन करत आहोत.हे टॅलेंट जपणार का असा आमचा समाजाला खडा सवाल आहे
मंथन कणबरकर
मोबाईल-7411276776