येथील नामवंत होमिओपॅथी तज्ञ आणि लेखिका डॉ सोनाली सरनोबत यांनी आणखी एक भरारी घेतली आहे. स्मार्ट सिटी या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनेवर अभ्यास करून त्यांनी एक स्वतंत्र पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक अमेझॉन या साईटवर उपलब्ध करण्यात आले आहे.
स्मार्ट सिटी म्हणून घोषित झालेल्या बेळगाव तसेच इतर २० शहरांचा अभ्यास त्यांनी या पुस्तकात मांडलाय.
डॉ सोनाली या उत्तम डॉक्टर आणि तितक्याच उत्तम लेखिका आहेत. यापूर्वी आरोग्यमंत्रा या त्यांच्या मराठी आरोग्यविषयक माहिती पुस्तकाचे इंग्रजी आणि कन्नड मध्ये भाषांतर झाले आहे.