जुनेबेळगाव-हालगा मुख्य रस्त्याला लागून बळारी नाल्यात महेंद्द धोगंडी हे अतिक्रमण व बेकायदेशीरपणे पिकाउ जमीनीत भराव टाकून 20 ते 30 फूट आत कॉलम व बिम टाकून विट बांधकाम करत आहेत, असे असताना प्रशासन हे काम थांबविण्यात हतबल झाले आहे, यापूर्वीही हे शेती बचाव समिती व परिसरातील शेतकऱ्यांना कळताच सदर बांधकाम बंद पाडून शहापूर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार तसेच जिल्हाधिकारी,मनपा व कर्नाटकचे मा मुख्यमंत्री,कृषीमंत्री यांना निवेदन देत सदर काम बंद करुन दरवर्षी पावसाच्या पुराने भात पिकांचे नुकसान थांबवून शेतकऱ्यांना वाचवा अशी विनंती केली होती.त्यानंतर मनपा अभियंत्या निपानिकर यांनी अतिक्रमण केलेले बांधकाम पाडवून आले होते तरीही न जुमानता मुजोर धोगंडीने पर तिथे बांधकाम सुरु केले.मुख्यमंत्र्याच्या आलेल्या पत्रालाही केराची टोपली तसेच संबधीत तलाठीच्या नोटीसीला उत्तर नाही किंवा सर्कल भांडगे यांच्या ते काम स्थगीतीलाही न जमानता पुन्हा जोरात बळ्ळारी नाल्यात बांधकाम सुरु आहे म्हणून शेतकऱ्यांनी संबधीत तलाठी व पोलीसांना तेथील परिस्थितीची कल्पना देऊन प्रत्यक्ष जागेवर जाऊन तिथे सुरु असलेले काम थांबवून नंतर धोगंडीला पोलिस ठाण्यात बोलावून त्याच्याकडून लिहून घेतल कि सदर बांधकाम बंद करुन शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीचे निवारण व सरकारी नियमानुसार मोजमाप करुनच नंतर काम सुरु करेन तसेच शेतकऱ्यांची वहीवाटीची जागा खुली करुन देईन.पण येवढे होऊनही मुजोर महेंद्र धोगंडी ऐकत नसेल तर प्रशासन हतबल नाही तर काय ? हा प्रश्न गंभीर आहे.
सौजन्य राजू मरवे