खानापूर विधानसभा मतदार संघात स्थानिक काँग्रेस नेत्यांत चढाओढ आहे त्यातच स्थानिक माणसाला तिकीट दिल्यास पक्षाला अनुकूल वातावरण असेल असा मत प्रवाह आहे त्यामुळं खानापूर मधून अंजली निंबाळकर यांना उमेदवारी मिळणं कठीण आहे असं वक्तव्य पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केलं आहे.
सरकारी विश्राम गृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अंजली यांनी खानापुरात घर बांधलं आहे त्या तिथे वास्तव्यासाठी आहेत तरी देखील हाय कमांड परिस्थितीचा विचार करून स्थानिकाला प्राधान्य देतील अस देखील जारकीहोळी म्हणाले.
जारकीहोळी बंधू जनता दलाकडे या अफवा
बेळगाव जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही प्रकारची फूट नसून सर्वजण एक आहेत जारकीहोळी ब्रदर्स जनता दलाच्या वाटेवर ही केवळ अफवा आहे असं देखील जारकीहोळी यांनी नमूद केलंय. भाजप ला बेळगाव जिल्ह्यात 15 जागा मिळतील अस वक्तव्य म्हणजे येदुराप्पांचा गैरसमज आहे काँग्रेस कोणत्याही स्थितीत दहा हुन अधिक जागा जिंकेल असा दावा देखील त्यांनी केला