एका महिलेचा स्त्री भ्रूण हत्या केल्या प्रकरणी पोलिसांनी बसवराज पुगत्यानहट्टी नावाच्या बी एच एम एस डॉक्टर्स ला अटक करण्यात आली आहे. खडे बाजार पोलिसांनी अटक कारवाई केली आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अप्पासाहेब नरहट्टी यांनी दिलेल्या रिपोर्ट वरून ही कारवाई करण्यात आली आहे. आरोग्यधिकाऱ्यानी केलेल्या तपासात डॉ बसवराज हे गर्भपाताला कारणीभूत होते अस आढळलं आहे. वैष्णवी मोहिते या महिलेचा उपचारासाठी दाखल केले असता गर्भपाता वेळी गर्भात असलेल्या भ्रूणाच चुकीच्या पद्धतीने शस्त्र क्रिया केली होती त्यामुळं गर्भपात झालेल्या महिलेस अत्यवस्थ अवस्थेत के एल ई उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यानंतर या प्रकरणाची चौकशी आरोग्याधिकारी नरहट्टी यांनी तपास केला होता.गेल्या शनिवारी ही घटना घडल्या वर केवळ चार दिवसांत ही कारवाई झाली आहे