सांडपाणी प्रकल्पासाठी हलगा येथील शेतकऱ्यांचा सुपीक जमीन देण्यास विरोध अलारवाड येथे नैसर्गिक फ्लो असलेल्या ठिकाणी हा प्रोजेक्ट राबवा अशी शेतकरी संघटनेची आग्रही मागणी आणि नगर विकास मंत्री रोशन बेग यांचा बेळगाव दौरा या सगळ्याचा पाश्व भूमीवर शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक बनली आहे.
1977 ते आज पर्यंत हलगा सांड पाणी प्रकल्पाची पूर्ण माहिती द्या याचा अहवाल लवकर द्या अस पत्र महापौर संज्योत बांदेकर यांनी पालिका आयुक्त आणि के यु डब्लू एस अभियंत्यांना दिल आहे.
शेतकरी संघटनेने पालिका आयुक्त आणि नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार करत सांडपाणी प्रकल्पात घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. 1985 साली 5 कोटी 99 लाख 15 हजार रुपये निधी मंजूर झालेला प्रोजेक्ट्स निधी कुठं गेला? असा प्रश्न उपस्थित केला होता.1977 पासून आता पर्यंतचा या योजनेचा स्टेटस काय आहे याची संपूर्ण माहिती महापौरांनी मागितली आहे.
आगामी 30 मे रोजी हलगा येथील शेतकरी पालिकेवर भव्य मोर्चा काढणार आहेत या पाश्व भूमीवर या सगळ्याच उत्तर पालिका आयुक्तांना सर्वसाधारण बैठकीत द्यावं लागणार आहे. या प्रकरणाचा तपशील मागून महापौरांनी सेफ गेम खेळत अधिकाऱ्यावर दबाव वाढवला आहे