- 30 वर्षानंतर निघाला तसा आदेश-त्यावेळी के नारायण यावेळी एन जयरामत्यावेळी शरद पवार आज दिवाकर रावते
1 जून 1986 च्या कन्नड सक्ती आंदोलनात तात्कालीन एस पी के नारायण यांनी शरद पवार यांच्या बेळगाव बंदीचा आदेश दिला होता तरी देखील पवार यांनी वेशांतर करून बेळगावात दाखल झाले होते इतकंच नाही तर कन्नड सक्ती विरोधातील आंदोलन यशस्वी केलं होतं मात्र बेळगाव पोलिसांनी त्यांना अटक करून कारगृहात डाम्बल होत . ही घटना पूर्ण होऊन आज 30 वर्ष उलटली आहेत आणि संयोगाने तशीच परिस्थिती आज निर्माण झाली आहे.
या घटनेतील पात्र बदलली आहेत शरद पवारांच्या जागी दिवाकर रावते आणि दीपक सावन्त तर तात्कालीन एस पी के नारायण च्या जागी आदेश बजावणारे जिल्हाधिकारी एन जयराम आहेत.
गुरुवारी बेळगावात मराठी परी पत्रकासाठी होणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यासाठी शिवसेना मंत्री दिवाकर रावते, दीपक सावंत हे येणार आहेत मात्र जिल्हाधिकारी एन जयराम यांनी आदेश काढत एक दिवसाची बेळगाव प्रवेश बंदी जाहीर केली आहे.त्यावेळी वेश पालटून शरद पवार हे बेळगावात दाखल झाले होते पवारांचा आदर्श रावते घेतील का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे