रोशन बेग यांच्या वक्तव्या नंतर मराठी सदस्यांनी आपला मराठी बाणा दाखवण्यास सुरुवात केली असून बेळगाव तालुका पंचायतीच्या सभेत मराठी सदस्यांनी जय महाराष्ट्राचा नारा देत सभागृह दणाणून सोडल आहे.
बुधवारी सकाळी तालुका पंचायतीच्या सर्व साधारण बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी मंत्री रोशन बेग यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत आपण जय महाराष्ट्र म्हणणारच असे बैठकीत सुनावले. यावेळी कन्नड सदस्यांनी स यावर पडदा प्रयत्न केला,मात्र संतापलेल्या मराठी सदस्यांनी जय महाराष्ट्र अशा घोषणा देत सभागृहात एकाच गदारोळ माजविला,
अध्यक्षस्थानी शंकरगौडा पाटील होते, वारंवार मागणी करूनही आम्हाला का मराठीतून कागदपत्रे दिली जात नाहीत असा प्रश्न उपस्थित केला, यावर साऱ्यांनीच वेळ मारूननेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुनील अष्टेकर, रावजी पाटील आदींनी घोषणा दिल्या