मलबारी आणि त्याचे सारे साथीदार अजूनही पोलिसांच्या हाती लागले नाहीत, यामुळे अजूनही बेळगावला, येथील जनसामान्यांना आणि मान्यवरांना धोका आहेच.बेळगाव live ला हा धोका मोठ्याप्रमाणात जाणवतोय.
रशीद मलबारी हा तसा साधा माणूस नाही, तो क्रूरकर्मा आहे. दाऊद गँग चालविण्याऱ्या छोटा शकील चा तो महत्वाचा हस्तक, बेळगावात मोठा घातपात घडवून बक्कळ खडणी गोळा करण्याची त्याची असुरी इच्छा, ती अजून पूर्ण झाली नाहीच, यामुळे बेळगाव पोलिसांसमोरील आव्हान जसेच्या तसेच टिकून आहे, ते त्यांना स्वीकारावे लागेल कारण क्रूरकर्मा रशीद अजून पोलिसांच्या हाती लागला नाही, कट समजला आणि तो आवरला असे म्हणून पोलिसांनी निर्धास्त झोपायची ही वेळ नव्हे, असे एक सामान्य बेळगावकरांचा आवाज असलेल्या बेळगाव live ला वाटते.
रशीद हाती लागेतोवर बेळगावकरांना आणि रशीदच्या हिटलिस्टवर असलेल्यांना तरी किमान झोप लागणार नाही
नजीर नदाफला हाताशी धरून खून आणि खंडणी वसुलीचे जे काही कट शिजले ते साधे नव्हते, गोव्याचा हॅकर आशिष आणि त्याचा मित्र ऐयाझ किंवा रोहन सुरेश रेडेकर यांच्या खुनांनी बेळगाव हादरले, प्रकाश शिरोळकर व आमदार संभाजी पाटील यांच्या खुनाच्या कटांनी हा हादरा वाढविला, आणखी २० ते २५ जणांची यादी आहे,अशी माहिती बेळगाव live ला मिळाली ती धक्कादायक आहे. पोलिसांनी ती यादी उघड केली नाही, ते कट आणि ती यादी सत्यात उतरू नव्हे म्हणून बेळगाव पोलिसांचे प्रामाणिक प्रयत्न आहेत, ते गुंड यशस्वी होऊ नयेत आणि पोलिसांना यश यावे हीच बेळगाव live ची प्रार्थना,
आजही बेळगावात डी टोळीचे सदस्य कार्यरत आहेत, रशीदच्या शोधात पोलीस आहेतच, मात्र त्यांना अजून यश नाही, रशीद सापडला नाही तर त्याच्या कारवाया वाढतील यात शंका नाही, धोक्याची तलवार अजून कायम आहे.
शिवजयंतीच्या मिरवणुकीत राडा करण्याचा उद्देश कशाचे द्योतक आहे? नशिबाने जे वाचले ते यापुढे सुरक्षित राहतील काय?सार्वजनिक गणेश उत्सव आणि शिवजयंती उत्सवात पोलिसांनी यापुढे डोळ्यात तेल घालून बंदोबस्त करण्याची गरज आहे, नाहीतर टळलेला अनर्थ घडेल, आणि हाहाकार माजेल, वेळीच सावध होण्याची गरज आहे
एरव्ही आपली ताकद मराठी माणसांवर दाखविणाऱ्या कर्नाटकच्या पोलिसांनी या गुन्हेगाराची पाळेमुळे खणावी लागतील नाहीतर अनर्थ घडू शकतो. बेळगाव live ची ही एकच सूचना आणि मागणीही.