बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील डी सी सी बँकेच्या हेबबाळ शाखेत धाडसी दरोडा घालण्यात आला आहे.
शुक्रवारी पहाटे हा दरोडा घालण्यात आला असून खिडकीच्या माध्यमातून बँकेत प्रवेश करून गॅस वेल्डिंग आणि कटर च्या साहाय्याने लॉकर तोडून 5 किलो सोने आणि 26 लाख रुपये रोख रक्कम लंपास केली आहे.
सोमवारी सकाळी बँक मॅनेजर बँकेत जाऊन प्रवेश केला असता चोरी झालेली लक्षात आली त्यानंतर पोलीस प्रमुख रविकांत गौडा आणि पथक श्वान पथकासह दाखल झालेत आणि तपास सुरू आहे.यमकनमर्डी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे