हालगा जवळील आर एन शेट्टी दगडी कुंडात पोहायला गेलेल्या मराठा मंडळ कॉलेजच्या विद्यार्थ्याचा बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
बेळगाव तालुक्यातील हंदीगनूर गावचा पिराजी माऊत वय 18 मृतक युवकाच नाव असून शुक्रवारी दुपारी ही घटना घडली आहे.निलजी येथील मित्राच्या घरी जेवणास गेला असता तो सुवर्ण विधान सौध पासून जवळ असलेल्या दगडी कुंडात तो पोहायला गेला असता सदर घटना घडली आहे. पोलिसांनी बुडलेल्या युवकाच शव मिळवण्यासाठी शुक्रवार दुपार पासून प्रयत्न चालवले मात्र शनिवारी सकाळी त्याच शव मिळालं असून नातेवाईकांच्या हवाली करण्यात आलं. मृतक पिराजी माउत ची 12 वी परीक्षा सम्पली होती त्यामुळं तो रिलॅक्स होता. हिरेबागेवाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.