- गणेशोत्सवाच्या मूर्ती साठी ज्यांचं नाव बेळगाव शहरात अग्रक्रमाने घेतलं जातं ते मूर्तीकार जे जे पाटील वय ९० आज आपल्यात नाहीत . शुक्रवारी 14 एप्रिल रोजी अनगोळ येथील आपल्या राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला वृद्धपकाळाने त्यांचं निधन जरी झालं असलं तरी शहरासाठी त्यांच काम अजूनही आठवणीतल राहणार आहे
असे ख्यात मूर्तीकार जे जे पाटील यांच निधन झालंय गेल्या 70 वर्षा पासुन ते गणेशमूर्ती बनविण्याचं काम करत होते अनगोळ मधील उत्साही गणेश उत्सवाचं श्रेय जे जे पाटील यांच्या मूर्तिकारीला द्यावं लागेल फक्त बेळगावच नव्हे तर हुबळी इचलकरंजी गोवा आदी भागात देखील बनविलेल्या मूर्ती ख्यात होत्या
विक्रम विनायक आणि विश्वनाथ हे त्यांचे तिन्ही चिरंजीव देखील त्यांच्या पश्चात मूर्ती बनविण्याचं काम करत आहेत अश्या या अवलीयाच्या कार्यास सलाम आणि बेळगाव live कडून भावपूर्ण श्रद्धांजली
Trending Now