शीतल हॉटेल ते भेंडी बाजार सर्कल आझाद गल्ली पर्यंत 40 फूट रुंद मास्टर प्लॅन रस्ता रुंदीकरण मोहिमेस गुरुवार पासून सुरुवात करण्यात आली .
शनिवारी दुपार नंतर पालिका आयुक्त एम शशीधर कुरेर यांनी मार्किंग केलेली इमारती अन्यथा बुलडोझर लावू असा इशारा देत थेट कारवाई सुरूच केली.
गुरुवारी पालिकेच्या वतीनं शीतल हॉटेल पासून भेंडी बाजार चौक पर्यत ची सगळी अतिक्रमण हटविली. पीडितांना नुकसान भरपाई न देता पालिकेच्या वतीनं मास्टर प्लॅन मोहीम राबविली जात आहे.
काही काळ तणाव
मास्टर प्लॅन मोहीम राबवत असताना एका विशिष्ट समाजातील व्यापारी पाडवण्यास नकार देत होते त्यामुळे या गल्लीत मास्टर प्लॅन मोहीम राबवताना अडथळे येत होते .पांगुळ गल्ली भागातील युवकांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन सरसकट सगळ्या गल्लीत मास्टर प्लॅन राबवण्यासाठी तगादा धरल्यावर सगळया गल्लीत मास्टर प्लँन मोहीम राबविण्यात आली. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं पोलिसांनी हस्तक्षेप करून तणाव कमी केला मास्टर प्लॅन मोहीम पूर्ण केली.