एका युवतीने पोलीस स्टेशन मधेच पोलीस निरीक्षकासमोर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला .या घटनेमुळे पोलीस स्थानकात एकच खळबळ उडाली.कॅम्प पोलीस स्थानकात सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. विष प्राशन केलेल्या तरुणीला जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्वरित नेण्यात आले.आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव श्रुती असून तिचे लग्न ठरले होते. एप्रिल महिन्यात लग्न होणार होते पण सासरच्या लोकांनी पाच लाखाची मागणी केली होती.त्यातच भर म्हणून तिच्या होणाऱ्या पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला होता.श्रुती आणि तिच्या पालकांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन घडला प्रकार कथन केला होता. श्रुतीच्या घरची परिस्थिती पाच लाख देण्याची नसल्याने आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेतला गेल्यामुळे निराश झालेल्या श्रुतीने चक्क पोलीस स्थानकात जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला
Less than 1 min.
Next article