बेळगाव मराठा मंडळ इंजिनियरिंग कॉलेज च्या एक शिक्षकासह 8 जणांचा मालवण येथील वायरी बीच वर समुद्रात बुडून हृदय द्रावक मृत्यू झाला आहे सकाळी साडे अकाराच्या सुमारास ही घटना घडली आहे .
इंजिनिनियरिंग कॉलेज चे 2 शिक्षकासह एकूण 49 जण मालवण ला सहली साठी गेले होते. सकाळी वायरी बीच वर ते अंघोळी साठी उतरले असताना ही घटना घडली आहे. संकष्टी च्या दुसऱ्या दिवशी समुद्राला उधान येते खोल वर उतरू नका असा सल्ला वायरी बीच वरील गावकऱ्यांनी दिला होता पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं त्यावेळी विध्यार्थी बुडलें अशी माहिती मिळत आहे.घटना स्थळी सिंधुदुर्ग पोलीस दाखल झाले असून मृतदेह बाहेत काढण्यात आले आहेतमराठा मंडळ इंजीनियरिंग कॉलेज
3 मुली5 मुले मृत्यु2 प्राध्यपाक यांच्यासह 49 जणांचा ग्रुप सहलीसाठी गेला होता.या घटनेवर मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा राजेश्री हलगेकर यांनी दुःख व्यक्त केलं आहे
दोन शिक्षकांसह इंजिनिअरिंगचे विद्याथी सहलीसाठी शनिवारी सकाळी मालवणात दाखल झालेत. यावेळी वायरी शिवाजी पुतळ्यानजीक तेली पाणंद येथील समुद्रात काही विद्यार्थी स्नानासाठी समुद्रात उतरलेत. यावेळी काही ग्रामस्थांनी समुद्रात उतरु नका, असा इशारा दिला होता. समुद्र धोकादायक असल्याची माहिती दिली. मात्र, उत्साही तरुणांनी त्याकडे दुर्लक्ष करत समुद्रात उतरण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या जीवावर बेतल्याची प्रतिक्रिया काही ग्रामस्थांनी व्यक्त केली.
सिंधुदुर्गात पर्यटन करण्यासाठी बेळगाव येथील इंजिनिअरिंग कॉलेजचे ४७ विद्यार्थ्यांचा ग्रुप मालवण येथे आला होता. फिरण्यासाठी ते वायरी या समुद्र किनारी आले होते. काहीजण पाण्यात खेळत होते. तर काहींही अति उत्साहात स्नानासाठी समुद्रात गेले.यावेळी अचानक आलेल्या लाटेमुळे घाबरेलत. त्यांनी पाण्यातच एकमेकांना घट्ट मिठ्या मारल्या. त्यामुळे ११ जण बुडालेत. त्यापैकी ८ जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे.
एका विद्यार्थिची स्थिती अत्यंत गंभीर जखमी असून तिला अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. बुडालेल्यांपैकी तीन जणांना स्थानिकांनी स्कूबा डायव्हरच्या मदतीने समुद्रातून बाहेर काढले.
मृतांची नावे
– मुजममील हनिकार
– किरण खांडेकर
– आरती चव्हाण
– अवधूत तहसीलदार
– नितीन मुत्नाडकर
– करुणा बेर्डे
– माया कोल्हे
– प्रा. महेश कुडुचकर
गंभीर तिघांवर उपचार सुरु
– संकेत गाडवी
– अनिता हानली
– आकांक्षा घाडगे
मुजममील हनिकार
किरण खांडेकर
आरती चव्हाण
अवधूत तहसीलदार
नितीन मुत्नाडकर
करुणा बेर्डे
माया कोल्हे
प्रा. महेश कुजडकर
(सर्व राहणार बेळगाव )
अत्यवस्थ (सिरीयस)
संकेत गाडवी
अनिता हानली
आकांक्षा घाडगे