नकटीच्या लग्नात सतराशे साठ विघ्न या म्हणी प्रमाणे बेळगाव शहराला स्मार्ट करायला निघालेल्या राज्य आणि केंद्र सरकारला योजना सुरू करण्यात अनेक कारणांनी विलंब होत आहे. एकीकडे खासदार सुरेश अंगडी यांनी स्मार्ट सिटी योजना सुरुवात होण्यास विलंबास अधिकारी आणि पालकमंत्री रमेश जारकीहोळी जबाबदार आहेत असा आरोप करून काही अवधी उलटला असताना स्मार्ट सिटी प्रोजेक्त चे मुख्य कार्यकारी संचालक मुलीयन यांची शिमोगा महा पालिका आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे.
एक वर्ष उलटलं तरी स्मार्ट सिटीच एकही काम अजून सुरू झालेल नाही त्यातच एम डी ची बदली झाल्यानं स्मार्ट करण्याचा प्रयत्नास धक्का मानला जात आहे
नियुक्ती नंतर नवीन एम डी ची स्मार्ट सिटी प्रोजेक्त मध्ये कंपनी संचालक मंडळात समाविष्ट करणे त्या नंतर केंद्रीय मंत्रालयाची अनुमती मिळवणे या नंतर कामाची सुरुवात होणार आहे. आय ए एस अधिकारी मुलाई मुहिलन यांनी 27आक्तोम्बर 2016 मध्ये एम डी बेळगाव स्मार्ट सिटी प्रोजेक्त पदभार स्वीकारला होता. अनेक तांत्रिक अडचणी मूळ स्मार्ट बेळगाव करण्यात विघ्न वाढली आहेत
Trending Now