बेळगावच्या स्मार्ट सिटी योजनेचे काम हाती घेतलेल्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंसीला नगर विकास खात्याने दिरंगाई केल्याबद्दल नोटीस बजावली.नोटीस बजावल्यावर कंपनीच्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली आणि त्यांनी बेळगावला धाव घेतली.,बेळगावला येऊन महानगरपालिका आणि बुडा अधिकाऱ्याच्या समवेत बैठक घेतली.बैठकीत स्मार्ट सिटी योजनेत केल्या जाणाऱ्या कार्याची माहिती दिली.पण महापालिका आणि बुडाचे अधिकारी त्यांनी केलेल्या सादरीकरणावर समाधानी नाहीत.अगोदर चार महिने उशीर झाला असून अशा तर्हेने कामे होणार असतील तर ते उपयोगी नाही.कंपनीच्या एम डी नी स्वतः बेळगावला येऊन काम मार्गी लावावे अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल असा सूर अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
Less than 1 min.
Previous article
Next article