जनतेच्या विश्वासास पात्र ठरलेल्या श्रीमाता को ऑप क्रेडिट सोसायटीने रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे.सोसायटीला निव्वळ नफा सात कोटीहून अधिक झाला असून भागधारकांना दहा टक्के लाभांश वितरित करण्यात येणार असल्याची माहिती सोसायटीचे संस्थापक चेअरमन मनोहर शामराव देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोसायटीचे खेळते भांडवल 307 कोटी असून वार्षिक उलाढाल 1660 कोटी आहे.एकूण सभासद 89329 आहेत.ठेवी 237 कोटीच्या असून कर्ज 212 कोटींचे वितरित करण्यात आले आहे.संस्थेच्या कर्नाटक,महाराष्ट्र आणि गोव्यात एकूण चाळीस शाखा आहेत.
जलसंवर्धनाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती,संस्था याना प्रोत्साहन देऊन पाणी अडवा पाणी जिरवा संदेश जनतेपर्यंत सोसायटीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.आदर्श खेड्याना बक्षीस देण्याची योजनाही अंतिम टप्प्यात असल्याचे मनोहर देसाई यांनी सांगितले.पपत्रकार परिषदेला व्हाईस चेअरमन चंद्रकांत पाटील,जनरल मॅनेजर महेश वस्रद आणि संचालक उपस्थित होते.