शिव जयंतीच्या लोकमान्य चित्ररथ स्पर्धेत मिळालेले रोख बक्षीस मिरापूर गल्ली येथील जळीत ग्रस्थाना देण्याचा मोठेपणा वडगावच्या श्रेया सव्वाशेरी हिने दाखवला. तिचा आदर्श घेऊन इतर मंडळेही पुढे सरसावली, यामुळे महापौरांनी तीचा विशेष सत्कार केला आहे.
मागील वर्षी श्रेया हिने मंगाई गल्ली येथील चित्ररथावर बाल शिवाजी ची भूमिका सादर केली होती तिला वयक्तिक अभिनय गटात रोख दोन हजार रूपयांचे बक्षीस मिळाले होते.
लोकमान्य रंगमंदिरात हा कार्यक्रम झाला , त्यावेळी श्रेयाने आपली इच्छा व्यक्त केली होती.
श्रेया ही एक चांगली नृत्यांगना असून भाषण करण्याची आवड आहे
श्रेयाचं अनुकरण करत लोकमान्य चित्ररथ स्पर्धेत विजेत्या अनेक कलाकार आणि मंडळांनी जळीत ग्रस्थाना मदत एकूण 30 हजारांची मदत दिली
Trending Now