निवृत्त डी एस पी वर हल्ला केल्या प्रकरणी शिवाजी सुंठकर यांना माळ मारुती पोलिसांनी अटक केली असून 28 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी जे एम एफ सी तृतीय न्यायालयानं सुनावली आहे.
रामतीर्थ नगर येथील निवृत्त डी एस पी सदानंद पडोलकर यांना मारहाण केल्याचा आरोप शिवाजी सुंठकर यांच्यावर ठेवला असून आय पी सी 307, 323, 324 अशी जीवे मारण्याचा प्रयत्न करणे असे गुन्हे नोंद झालेत.
निवृत्त डी एस पी वॉकिंग ला जात असतेवेळी सुंठकर यांच्यासह त्यांचा मुलगा आणि सहकाऱ्यांनी हल्ला केल्याची तक्रार निवृत्त डी एस पी नि पोलिसांत दिली होती त्यानुसार हे गुन्हा नोंद करण्यात आले आहेत.
सोमवारी सकाळी सुंठकर यांना कोर्टात हजर करण्यात आले त्यावेळी एकीकरण समितीचे टी के पाटील , भाऊ गडकरी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते .कणबर्गी कत्तल खान्याला विरोध म्हणुन राजकारण करून लोकप्रतिनिधी कडून सुंठकर यांना त्यात गोवले जात असल्याचा आरोप टी के पाटील यांनी केला आहे