बेळगाव शहरा प्रमाणे उपनगरातदेखील शिव जयंतीचा जल्लोष उत्साह तितकाच असतो एकाद्या कार्निव्हाल प्रमाणे बेळगावात शिवा जयंती साजरी केली जाते त्यातच शहापूर विभागाच्या शिव जयंतीची उत्सुकता आजही शहरवासियांना असते अशी माहिती शहापूर विभाग मध्यवर्ती शिव जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव यांनी दिली आहे . बेळगाव live ने जाधव यांची शिव जयंतीच्या निमित्ताने खास मुलाखात घेतली आहे त्यावेळी माहिती देताना जाधव यांनी ही माहिती दिली आहे.
शहापूर शिव जयंतीला १०० हून अधिक वर्षाचा इतिहास असून एके काळी कै बाळसाहेब कंग्राळकर, बाळकृष्ण कुसाने, बाळकृष्ण सुळेभावी,अशोक भंडारे असे दिग्गज लोक पुढाकार घेऊन या शिव जयंतीच आयोजन करत असत . शाहपूर भाग फिरून बेळगावात चित्र रथ जात होता या चित्र रथाचे शहर वासियांना खास आकर्षण असायचे ते आज ही आहे.
संदीप पाटील यांच्या सुचनेतून बदलला मार्ग
शाहपूर भागात जा संपर्क म्हणून आम्ही मध्यवर्ती च्या माध्यमातून काम करत असतो आज या भागात २५ शिव जयंती मंडळ असून १८ चित्ररथ बेळगाव शहरातील मुख्य मिरवणुकीत सहभागी होत असतात. गेल्या सात वर्षापूर्वी नरगुंदकर भावे चौकातील गर्दी चेंगरा चेंगरी पाहता धोका ओळखून तत्कालीन एस पी संदीप पाटील यांनी सूचना केली असता मंडळातून जनजागृती करून आम्ही शाहपूर चित्ररथ बेळगावात शहरात सामील होण्याचा मार्ग बदलला आहे .एकेकाळी पाहते चार वाजले तरी आमचे शहापूर मधील चित्ररथ मारुती गल्लीती अडकून राहायचे मात्र आता एस पी एम रोड आंबा भवन सेंट मेरीज कडून संभाजी चोकातून मुख्य मिरवणुकीत हे चित्र रथ सहभागी होतात असंही नेताजी जाधव म्हणाले .