श्री राजमाता महिला मल्टिपर्पज को ऑप सोसायटीला पंचाहत्तर लाखाहून अधिक नफा 2016-17 वर्षात झाला आहे.श्री राजमाताने ठेविधारक आणि भागधारकांचा विश्वास संपादन केला आहे.पारदर्शक व्यवहारामुळे श्री राजमाताने सहकार क्षेत्रात आपली वेगळी नाममुद्रा उमटवली आहे,असे उदगार श्री राजमाताच्या चेअरपर्सन मनोरमा देसाई यांनी काढले.श्री राजमाताच्या चोवीसाव्या सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या. संचालिका प्रतिभा नेगीनहाळ यांनी उपस्थितांचे स्वागत करून ठराव मांडले.व्यवस्थापिका सुवर्णा बिर्जे यांनी मागील वर्षाच्या सभेचा वृत्तांत सादर केला.राहुल खानापूरकर यांनी सोसायटीच्या कार्याचा आढावा घेतला.भागधारक आणि ठेविधारकांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
सोसायटीचे खेळते भांडवल चोवीस कोटीहून अधिक आहे.वार्षिक उलाढाल शहात्तर कोटीहून जास्त आहे.ठेवी वीस कोटीच्या असून चौदा कोटीहून अधिक कर्ज वितरित करण्यात आले आहे.
Trending Now