प्यास फौंडेशन ने बेळगाव सभोतालच्या दुष्काळ पीडित गावातून पिण्याचं पाणी पोचवुन अनेक गावांची तहान भागविली आहे. गेल्या वर्षी प्यास ने दररोज 8000 लोकांना तब्बल तीन महिने घरोघरी पाणी पोचवत पुरवठा केला आहे. या वर्षी देखील बेळगाव परिसरातील अनेक गाव दुष्काळास तोंड देत आहेत.
म्हणून यावर्षी देखील प्यास ने दुष्काळी गाव शोधुन पाणी पुरवठा करण्यासाठी सर्वे करत पाणी सप्लाय सुरू केलं आहे. आगामी रविवारी सर्व्हे केला जाणार असून त्याच्या पुढच्या रविवारी पासुन पाणी पुरवठा केला जाणार आहे. या कार्यास निधीची नितांत आवश्यकता असुन जनतेने सढळ हस्ते मदत निधी उभारण्यास मदत करावी आणी तहान भागवण्यासाठी एक हात पुढं यावं असं आवाहन करण्यात आलंय.यावेळी पाणी मदतीची वेगळी योजना बनविली असुन एक टँकर पाणी स्पॉन्सर पासून 500 रुपये पर्यंत मदत करू शकतात . तर चला प्यास फौंडेशन च्या या कार्यास सहकार्य करू आणि अनेकांची तहान भागवु…