पूर्ण देशात होणार नाही अश्या भव्य दिव्य बेळगावातील शिवजयंती मिरवणुकीडे राज्यातील पोलिसांचं लक्ष लागून राहिलेलं असतं रविवारी रात्री होणाऱ्या मिरवणुकीत कडेकोट असाच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस आयुक्त कृष्ण भट्ट यांनी मिरवणुकीत डॉल्बी वापरावर पूर्ण बंदी घातली असून समाज कंटकावर नजर ठेवण्यासाठी तब्बल 250 सी सी टी व्ही कॅमेरे मिरवणूक मार्गावर बसविण्यात आले आहेत.पोलीस आयुक्त कृष्ण भट्ट यांनी पत्रकार परीषदेत ही माहिती दिली आहे
रविवारी सकाळी 6 पासून सोमवारी सकाळ 10 पर्यंत शहर परीसरात मद्य विक्री बंद करण्याचा आदेश दिला असून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मिरवणुकीत पूर्णपणे डॉल्बी वर बंदी असणार आहे.भट्ट यांनी सांगितले की मिरवणुकीत 3 डी सी पी 17 ए सी पी 38 सी पी आय 69 पी एस आय,1000 पोलीस ,12 के एस आर पी प्लाटूनस, तैनात असणार आहेत.