ग्रामीण भागातील जनतेला यावर्षी च्या कडक उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी जायंट्स मेन च्या माध्यमातून व हॉटेल मधुराचे मालक आणि जायंट्स मेन चे सदस्य मधु बेळगावकर याच्या आर्थिक सहकार्यातून हा उपक्रम करून चार ठिकाणी हि सोय केली त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, असे उदगार उचगाव ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा योगिता देसाई यांनी काढले,
उचगाव येथे प्रथमच ग्रामीण भागातील वाटसरूना पिण्याच्या पाण्याची सोय केली,जायंट्स मेन च्या वतीने उभारलेल्या “पाणपोई” च्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
“पाणपोई” साठी लागणारे स्टँड, माठ, आणि पाणी पिण्यासाठी लागणारे ग्लास हे हॉटेल मधुरा च्या वतीने देण्यात आले.
सर्वपथम उचगाव ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा योगिता देसाई यांनी माठाचे कुंकूम तिलक लावून व पुष्पहार घालून पूजन केले, त्यानंतर उद्योगपती विषुपंत देसाई यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पाणपोईचे उदघाटन केले.
यावेळी तूरमुरी ग्राम पंचायत अध्यक्ष नागनाथ जाधव, ग्राम पंचायत सदस्य भास्कर कदम, ब्राम्हलिंग पाटील, रामा कदम, लक्ष्मण चौगुले, नारायण चौगुले यांच्यासह जायंट्स मेन चे सदस्य उपस्थित होते.
हॉटेल मधुरा वेंगुर्ला रोड येथील पाणपोईचे उदघाटन अमोल बेळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर तूरमुरी येथे तूरमुरी ग्रापंचायत अध्यक्ष नागनाथ जाधव व मधुरा हॉटेलचे मालक मधु बेळगावकर यांच्या हस्ते पाणपोई चे उदघाटन करण्यात आले,
सुळगा (हीं) येथील पाणपोई चे उदघाटन एपीएमसी सदस्य निगप्पा जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून केले. याठिकाणी प्रकाश बेळगुंदकर यांनी स्वागत केले.
याठिकाणी अशोक पाटील, एन वाय चौगुले, पांडुरंग पाटील, परशराम पाटील, सीताराम पाटील, खेमना कलखांबकर , माधुरी, कित्तूर, रेश्मा मरुचे, उत्तम सनदी, दशरथ कोलते , जायंट्स चे स्पेशल कमिटी मेंबर मोहन कारेकर,अध्यक्ष उमेश पाटील, उपाध्यक्ष सुनील भोसले,माजी अध्यक्ष मदन बामणे, सेक्रेटरी महादेव पाटील, मल्लिकार्जुन सत्तीगेरी, लक्ष्मण शिंदे, विकास कलघटगी, सुनील मुतगेकर, राहुल बेलवलकर, पुंडलिक पावशे उपस्थित होते,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुंडलिक पावशे यांनी केले.