बेळ्ळारी नाला येथे सरकारी जमिनीवर अतिक्रमण प्रकरणी ग्राम सेवकाने भू कायदा १९५ अंतर्गत धोंगडी यांना कारणे दाकाहावा नोटीस बजावली आहे . जिल्हाधिकारी एन जयराम आणि प्रांत अधिकारी राजेश्री जैनापुरे वडगाव लक्ष्मी मंदिरात एका कार्यक्रमा निमित्य आले असता शेतकऱ्यांनी जमीन अतिक्रमणाचा मुद्दा शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला . यावेळी शेती बचाव समितीचे राजू मर्वे, ए पी एम सी सदस्य महेश जुवेकर ,नगरसेवक मनोहर हलगेकर,वडगाव कृषी पत्तीन सोसायटीचे गंगाधर बिर्जे आदींनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर जिल्हाधिकाऱ्यानी प्रांत अधिकाऱ्यांना घटना स्थळी जाऊन पाहणी करून कारवाई करण्याचे आदेश दिले.