चंद्रकांत कुरणकर यांच्या घराला आग लागल्यामुळे चार कुटुंबे अक्षरशः रस्त्यावर आली असून पुढे काय करायचे हा प्रश्न त्यांच्या समोर असला तरी गल्लीतील रहिवाश्यांनी स्वयंप्रेरणेने मदत गोळा करण्यास प्रारंभ करून हिम्मत हरू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असाच संदेश दिला आहे . एका लाखाहून अधिक रक्कम गल्लीतील रहिवाश्यानी गोळा केली असून संसारोपयोगी साहित्याचा मदतीचा ओघ देखील सुरूच आहे . गल्लीतील महिला युवक संघ संघटना जमेल तसं मदत देत आहेत 50 रुपये पासून हजरो रुपयांची मदत करत आहेत.
शॉर्ट सर्किटने आग लागल्यावर काही मिनिटातच चार भरलेली घरे बेचिराख झाली . त्यामुळे चंद्रकांत कुरणकर आणि त्यांच्या भावंडांवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि निराशेचे मळभ पसरले . पण गल्लीतल्या रहिवाश्यानी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत लढायचंच असा संदेश संसारोपयोगी साहित्य देऊन आणि एक लाख रु गोळा करून दिला . नगरसेवक महापौर आमदारांनी भेट देऊन सांत्वन केलंय आणि मदत करण्याच आश्वासन दिलंय मात्र खासदार सुरेश अंगडी यांनी याची दखल सुद्धा घेतली नाही आहे .भाजप नेते किरण जाधव अनेकदा किती मदत पाहिजे अशी विचारपूस करत आहेत. त्या भागाचे नगरसेवक विजय भोसले यांनी मात्र कुरणकर याना मदत करण्यास सर्वतोपरी प्रयत्न सुरु ठेवले आहेत . गावकरी ते राव न करी अशी म्हण आहे आणि ती सर्वार्थाने येथे लागू पडते .