शिवप्रेमी अर्जून ग्रुप (सोनी)मिरज महाराष्ट्र यांनी आणली तंजावर हून मिरज पर्यंत अनवानी पायी शिवज्योत.
मिरजहून शिवप्रेमी ग्रुप तसेच असंख्य कार्यकर्ते तंजावरला जाऊन शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तंजावर राजवाडा व तिथेच स्थाईक असलेले वंशज व मराठा समाजाच्या सानिध्यात मोठा कार्यक्रम करुन शिवज्योत प्रज्वलित करुन आणत ४० ते ५० कार्यकर्ते अध्यक्ष राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिची,नामकल,सेलम,मैसूर, श्रवणबेळगोळ,दावनगीरीतील शहाजी महाराज समाधी स्थळास अभिवादन,कित्तूर, बेळगाव मार्गे त्यांच आगमन झाले जुनेबेळगाव नाक्यावर जुनेबेळगाव व रयत गल्ली मा.वडगाव शिवजयंती मंडळाने त्यांच स्वागत करुन शिवज्योतीला मालार्पण केले नंतर त्यांच्याबरोबर होसूर,खडेबाजार शहापूर नंतर श्री शिवाजी उद्यान मधे मध्यवर्ती शिवजयंती मंडळाने त्यांच स्वागत केले नंतर शिवरायांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण करुन विधीवत पुजा केली.त्यांची नाष्टा चहापानची व्यवस्था केल्यानंतर पुन्हा बेळगाव मधील मुख्य रस्त्यावरुन फिरत स्वागत होत कोल्हापूर मार्गे मिरजच्या दिशेने रवाना झाले.
Trending Now