मुतग्याचे मूर्तीकार एम जी पाटील महाराष्ट्र शासनाचा सन्मानमुतगा गावचे सुपुत्र मूर्तीकार एम जे पाटील यांचा महाराष्ट्र शासनाने सत्कार केला आहे. नुकताच मुंबई येथील नरिमन पॉईंट एन सी पी ए संचलित टाटा थिएटर मध्ये अर्थ वन मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी पारितोषिक देऊन गौरव केला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित 2016 गणेश उत्सव लोकमान्य टिळक यांनी दिलेल्या स्वराज हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या घोषणेच्या शताब्दी वर्षानिमित्त सार्वजनिक लोकमान्य गणेशउत्सव अभियान अंतर्गत गणेश सजावट जिल्हा स्तरावरील सार्वजनिक मूर्तिकार स्पर्धेत एम जी पाटील यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
इचलकरंजी मधील जय शिवराय गणेशोत्सव मंडळ यांनी सादर केलेला बेटी बचाओ बेटी पढाओ या समाज प्रबोधन देखाव्यास महाराष्ट्र शासनाचा तालुका स्तरावरील द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले हा पुरस्कार मिळवणारे इचलकरंजी मधील पहिले मंडळ आहे .
सांस्कृतिक कार्य विभागाचे सहाय्यक संचालक संतोष खामकर यांनी एम जी पाटील यांनी अभिनंदनाच पत्र दिला आहे