शिव आणि बसव जयंती निमित्य काढण्यात येणाऱ्या मिरवणूक मार्गातील अडथळे सर्व दूर करा आणि 21 किंवा 22 एप्रिल रोजी शिव जयंती ला पालिकेच्या वतीनं खास बैठकीचे आयोजन करा अशी मागणी करणार पत्र महापौर संज्योत बांदेकर यांनी पालिका आयुक्त एम शशीधर कुरेर यांना दिल आहे.
30 एप्रिल रोजी बेळगावात शिव जयंती मिरवणुक काढली जाणार असुन ही मिरवणूक ऐतिहासिक असते शहरात बाहेरील लाखो लोक शिव चित्र रथ देखावे पाहण्यासाठी येत असतात. नाथ पै सर्कल, बँक ऑफ इंडिया शहापूर, संभाजी चौक आणि कॉलेज रोड येथे पब्लिक गॅलरी उभी करावी तसेच मिरवणुक मार्गातील अडथळे दूर करावेत इलेक्ट्रिकल तारा काढाव्यात तसे आदेश हेस्कोम ला दह्यावेत अशी मागणी देखील केली आहे.
शिव सृष्टी च्या ठिकाणी दोन दिवस व्याख्यान असे कार्यक्रम आयोजित कराव यासाठी खास बैठक घ्यावी अश्या मागण्याच पत्र दिल आहे