बेळगावातील मराठा रेजिमेंट देशातील जुनं रेजिमेंट असून ऐतिहासिक केंद्र आहे सहा महिने हुन अधिक काळ खडतर परिश्रम घेतलेल्या प्रशिक्षणाचा उपयोग सीमेवर देश संरक्षण करताना होईल. असे मत आर्मी वार कॉलेज मुहू चे कमांडर,जे सी विंग, मेजर जनरल व्ही के एच पिंगळे यांनी काढले .
बेळगावातील मराठा सेंटर च्या 236 प्रशिक्षित जवानाच्या शपथ विधी सोहळ्यात बोलत होते. जवानाच्या जीवनात शारिरीक फिटनेस आणि शिस्त या दोन महत्वाच्या गोष्टी आत्मसात होतात असे ते सांगून जवानांनी शिस्त आणि संयम पाळावा अस ते पुढे म्हणाले
मराठा लाईट रेजिमेंटल सेंटर च्या तळेकर ड्रिल मैदानावर जवानांचा शपथविधी झाला, २३६ जवान देशसेवेत रुजू झाले.देशाच्या अनेक भागात त्यांचे पोस्टिंग होणार आहे.
यावेळी शानदार पथ संचलन झाले त्याचे जवान सुदर्शन वडगावे याने नेतृत्व केले होते. कॅप्टन रॉबिन अब्राहम यांच्या नेतृत्वाखाली शपथ घेण्यात आली. आर्मी वॉर कॉलेज मुहू चे कमांडर मेजर जनरल व्ही के एच पिंगळे यांना मानवंदना देण्यात आली.
जवान दिनेश खोत, अक्षय चव्हाण, सुदर्शन वाडगवे,वैभव चव्हाण ,अक्षय निकम या जवानाना उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या जवानांचा सत्कार करण्यात आला, लष्करी अधिकारी आणि जवानांचे पालक उपस्थित होते.