Thursday, March 28, 2024

/

शोकाकुल वातावरणात ५ जणांवर अंत्यविधी

 belgaum

mm-malwanमालवण दुर्घटनेत समुद्रात बुडून मृत्युमुखी पडलेल्या मराठा मंडळ इंजिनियरिंग कॉलेजच्या 8 विद्यार्थ्यांचे मृतदेह शनिवारी रात्री उशिरा बेळगावात आणण्यात आले होते.रात्री 11 च्या सुमारास चार रुग्ण वाहिकेतून सगळे मृतदेह शिनोळी मार्गे बेळगावात आणण्यात आले होते पाच मृतदेह सिव्हिल हॉस्पिटल च्या शवागारात ठेवण्यात आले आहेत तर तिघांवर रात्री उशिरा अंत संस्कार करण्यात आले
रविवारी सकाळी काकती येथें नितीन मुतनाडकर शहापूर येथे प्रा महेश कुडुचकर, शहरातील सदाशिवनगर स्मशानभूमीत अवधूत ताशीलदार, बेळगाव मुस्लिम स्मशान भूमीत मुझम्मील हन्नीगेरी, तर बंबरगा येथे माया कोले यांच्या मृतदेहावर अंत्य संस्कार करण्यात आले आहेत.

त्यावेळी मृतकांच्या नातेवाईकानीं गर्दी केली होती . नागरिकांनी प्रचंड शोकाकुल वातावरणात त्यांना अग्नी दिला. मृतकांच्या नातेवाईकानी हंबरडा फोडला होता यामुळे सारे चित्र हृदय द्रावक होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.