मालवण येथील दुर्घटनेत सुरुवातीपासूनच कोकणवासीयांनी मदतीचा हात दिला. सावंतवाडीचे शिवसेनेचे आमदार आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री दीपकभाई केसरकर यांनी तर बेळगावचे जावईपण पूर्णपणे जागले आहे.
दुर्घटनेतील मयतांचे मृतदेह ४ रुग्णवाहिकांच्या माध्यमातून बेळगावला पाठविण्यात त्यांनी आपले मोठे योगदान दिले, दुःखी पालकांकडून पैसे घेऊ नका असे सांगत त्यांनी तो सारा खर्च स्वतः दिला, विशेष म्हणजे पोलीस अधिक्षकांनाही त्यांनी सूचना दिली होती, माझ्या बेळगावच्या बांधवांना कोणताही त्रास होता कामा नये असे शब्द उच्चारून त्यासाठी प्रयत्न करणारे दीपकभाई ग्रेट आहेत.बाळासाहेबाची शिकवण आणि हाडाचा शिव सैनिक आहे हे सुद्धा त्यांनी दाखवून दिलं आहे
त्यांची पत्नी पल्लवीताई या बेळगावची कन्या. एक जावई म्हणून दीपकभाई जे वागले त्यासाठी सम्पूर्ण बेळगावच्या वतीने बेळगाव live चा त्यांना सलाम.
Trending Now